‘...तर मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल” ; धनंजय मुंडेचं विधान! | so once again we have to cross the border to protect the Marathi man Statement of Dhananjay Munde msr 87 | Loksatta

‘…तर मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल” ; धनंजय मुंडेचं विधान!

‘ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का?” असा प्रश्नही विचारला आहे.

Dhananjay Munde
(संग्रहित छायाचित्र)

Maharashtra Karnataka Border Dispute: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून या मुद्द्य्यांवरून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा – गुजरात, सोलापूर, जतच्या सीमेवर जे झालं, ते एकदम आत्ताच का होतंय? – शरद पवारांचा सवाल!

‘कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का? हे तातडीने न थांबल्यास मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल.’ असं धनंजय मुंडे ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

याशिवाय रोहित पवार यांनीही टीका केली आहे. ‘कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.’ असं रोहित पवारांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:53 IST
Next Story
“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला