सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. तृप्ती देसाई या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी घाणेरड्या कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनवले आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई या पुन्हा एकदा महिलांच्या हक्कासाठी काम करण्यासाठी सरसावल्या आहेत. यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. नुकतंच रबरी लिंगाच्या प्रात्यक्षिकाला तृप्ती देसाईंनी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे अनेकांना त्यांना ट्रोल केले होते. मात्र नुकतंच तृप्ती देसाईंनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तृप्ती देसाईंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
PCMC Bharti 2024
PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी; मिळणार ७० हजार पगार, जाणून घ्या, अर्ज कसा करावा?
puneri young man stand by holding poster in hand on which he write a very beautiful message about chhatrapati shivaji maharaj
VIDEO : ” छत्रपती शिवाजी महाराज नाचून नाही तर वाचून कळतात”; पुणेरी तरुणाचे पोस्टर चर्चेत, व्हिडीओ होतोय व्हायरल
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

तृप्ती देसाईंची फेसबुक पोस्ट

“प्रवाहाच्या विरोधात बोलायची हिंमत ठेवते, त्यामुळे गेल्या सात वर्षापासून आपल्यावरील टीका सहन करण्याची शक्ती वाढली आहे….

पण एक मात्र नक्की सांगेन, माझ्या मुद्द्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, मला अश्लील कमेंट केल्या तेच माझ्याबरोबर सेल्फी काढायला येत असतात, त्यांच्या घरातील महिलेवर अन्याय झाला तर माझ्याकडे मदतीसाठी येत असतात आणि कमेंट बाबत जाब विचारला तर जाहीर माफी मागत असतात….कामाची शक्ती कृतीतून दाखवायची असते, जी आत्तापर्यंत मी दाखवली आणि यापुढेही नक्कीच चांगले काम करीत राहीन.

बाकी घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांची मानसिकता त्यांनी स्वतः तपासली तर त्यांचे आयुष्य चांगले होईल, आम्हाला असल्या कमेंट्सने काडीमात्र फरक पडत नसतो यासाठीच ही पोस्ट.

पण आमच्या महिलांनी चुकून जर तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर त्याला तुमची स्वतःची कमेंटच जबाबदार असेल”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

तृप्ती देसाईंनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान तृप्ती देसाईंची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक होत्या. काही आठवडे घरात राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला.

त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकलंय हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे,” असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले.