शिवडे आणि राम कदम यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

शिवडे आणि आमदार राम कदम यांच्यावरील भन्नाट विनोद सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथे ‘Shivde, I Am Sorry’ अशा आशयाचे तब्बल ३०० फलक हे प्रियकराने लावले होते. त्यामुळे शहरात शिवडीची चर्चा जोरदार रंगली होती, मात्र पुढे हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपातून मिटवण्यात आले. परंतु भाजपाचे आमदार राम कदम यांनी तरुणीवर केलेल वादग्रस्त वक्तव्यावरून देखील आता शिवडेची आठवण पिंपरी-चिंचवडकरांना येत आहे. शिवडे आणि आमदार राम कदम यांच्यावरील भन्नाट विनोद सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

“शिवडीचा” बॉयफ्रेंड रात्री पासून घाटकोपरला राम कदम यांच्या घरा बाहेर बसला आहे…खर हाय काय? असा विनोदी मजकूर एका व्यक्तीने आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. तर ‘shivde i am sorry’ फलकाचा आधार घेत शिवडे कदमांच्या राम्याला सांगू का?अशा आशयाचे फोटो आणि पोस्ट व्हाट्स अॅप व्हारल होत आहेत. त्यामुळे शहरातील शिवडे हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथे रस्त्याच्या मधोमध विजेच्या खांबावर ‘shivde i am sorry’ चे फलक प्रियकराने प्रेयसीसाठी लावले होते.

त्यानंतर हे प्रकरण पोलिसात देखील गेले होते. मात्र प्रियकराचे काका हे नगरसेवक असल्याने आणि पिंपरी-चिंचवड मधील नातेवाईक देखील राजकीय असल्याने हे प्रकरण मिटवण्यात आले. त्यानंतर शिवडे हे प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले, काही पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. आता आमदार राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवडे प्रकरण समोर येत आहे.त्यांच्यावर भन्नाट विनोद व्हारल होत आहे. आमदार राम कदम यांचा फेसबुक वरून खरपूस समाचार घेतला जात आहे. त्यामुळे पोस्टचा पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Social viral shivde and ram kadam posts

ताज्या बातम्या