सोलापूर : एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह कारभारामुळे अनुत्पादक असलेली २३८ कोटींची कर्जे आणि त्यामुळे बँकेला सोसाव्या लागलेल्या ११०३ कोटी रुपयांची जबाबदारी तत्कालीन ३२ संचालक आणि दोन अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी सहकार विभागाला सुपूर्द केला असून घोटाळ्याची रक्कम संबंधित संचालकांकडून वसूल करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, बार्शी विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचा समावेश असल्याने या कारवाईच्या शिफारशीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबतचे रक्कम वसुलीचे प्रशासकीय आदेश लवकरच निघणार असल्याचे समजते.

Maharashtra Vidhan Sabha Election Result Live News Update: Maharashtra Government Swearing-in Ceremony Live Update
Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदेंची भेट घेण्याकरता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…

हेही वाचा >>>Amol Mitkari : राजकीय हालचालींना वेग; अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेताच अमोल मिटकरीचं सूचक ट्वीट, म्हणाले, “जंगल मे सन्नाटा…”

बँकेच्या संचालकांकडून त्यांच्याच नातेवाइकांच्या संचालकांना कोट्यवधीचे कर्जवाटप, तारण मालमत्तेपेक्षा जास्त प्रमाणात कर्जवाटप आणि अखेरीस हे कर्ज थकवत बँकेची फसवणूक करण्याचे हे प्रकरण आहे. बँकेच्या संचालकांनीच केलेल्या या घोटाळ्याची त्यावेळी असलेली रक्कम ही २३८ कोटी रुपये होती. या सर्व गैरव्यवहाराची दखल घेत रिझर्व्ह बँकेने २०१८ साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. तेव्हापासून आजतागायत बँकेत सहकार खात्याकडून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

दरम्यान, बँकेच्या आर्थिक नुकसानीची आणि तत्कालीन संचालक मंडळाची चौकशी करण्यासाठी राज्याचे सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सहकार कायदा १९६० च्या कलम ८८ नुसार डॉ. तोष्णीवाल यांनी चौकशी केली. यात सहा वर्षांनंतर चौकशीअंती बँकेच्या संबंधित तत्कालीन संचालकांसह अधिकारी आणि सनदी लेखापालांवर नुकसानीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यात आली.

या अहवालात दोषी ठरवलेले तत्कालीन संचालक आणि त्यांची त्यावेळची घोटाळ्यातील रक्कम कंसात पुढीलप्रमाणे – विजयसिंह मोहिते-पाटील (३.०५ कोटी), आमदार दिलीप सोपल (३०.२७ कोटी), आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (५५.५४ लाख), ठाकरे गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे (२०.७२ कोटी), माजी आमदार बबनराव शिंदे (३.४९ कोटी), त्यांचे बंधू संजय शिंदे (९.८४ कोटी), राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर( ३.३४ कोटी), बार्शीचे अरुण कापसे (२०.७४ कोटी), अक्कलकोटचे भाजपचे बंडखोर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (१६.९९ कोटी), पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे (११.४४ कोटी), काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (११.६३ कोटी), शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पुत्र आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे काका चंद्रकांत देशमुख (८.४१ कोटी) आदींचा समावेश आहे. घोटाळ्यातील या रकमेची व्याजासह ११०३ कोटी रुपये वसुलीची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>Rohit Pawar : “एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री आणि श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री..”, रोहित पवारांचा दावा काय?

याशिवाय ज्येष्ठ सहकार नेते, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक (११.८४ कोटी), माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील (३.१४ कोटी), शेकापचे माजी आमदार एस. एम. पाटील (८.७१ कोटी) या दिवंगत संचालकांवरही ठपका ठेवलेला आहे. दिवंगत संचालकांच्या वारसदारांकडून महसूल अधिनियमानुसार नुकसानीची रक्कम वसूल होऊ शकते. याबाबतचा निकाल सहकार खात्याचे सेवानिवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी गेल्या ९ नोव्हेंबर रोजी दिला होता. आता त्यांनी हा अहवाल सहकार विभागाला सुपूर्द केला असून घोटाळ्याची रक्कम संबंधित संचालकांकडून वसूल करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. याबाबतचे रक्कम वसुलीचे प्रशासकीय आदेशही लवकरच निघणार असल्याचे समजते.

सोलापूर जिल्हा बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी माझ्यावर होती. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश होता. याप्रकरणी तत्कालीन ३२ संचालक आणि दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या रकमेची पूर्ण वसुली त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांकडूनच करावी, असे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल मी राज्याच्या सहकार विभागाला सुपूर्द केला आहे.- डॉ. किशोर तोष्णीवाल, सहकारी सोसायटीचे निवृत्त अतिरिक्त रजिस्ट्रार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळाप्रकरणी तत्कालीन ३२ संचालक आणि दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. असून यातील रकमेची तत्कालीन संचालकांकडून लवकरच वसुली केली जाणार आहे. याबाबतचे आदेश लवकरच निघतील.- माजी आमदार राजेंद्र राऊत