सोलापूर : दोन तालमींच्या भांडणातून स्वतःच्या मुलाच्या झालेल्या खुनाचा सूड उगविण्यासाठी मुलाच्या मारेकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल वयोवृद्ध पैलवानासह सातजणांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गाजलेल्या खटल्याकडे सोलापूरकरांचे लक्ष वेधले होते.

पत्रा तालीम आणि पाणीवेस तालीम या दोन तालमीतील भांडणातून पूर्वीच्या खुनाचा सूड उगविण्यात आला होता. यात पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे (वय ३६) याचा ७ जुलै २०१८ रोजी रात्री नव्या पेठेजवळील डाळिंबी आडलगत मोबाईल गल्लीत कोयत्यांनी सपासप वार करून खून झाला होता. या खटल्यात सुरेश अभिमन्यू शिंदे ऊर्फ गामा पैलवान (वय ७४, रा. पाणीवेस तालीम) याच्यासह त्याचे साथीदार गणेश ऊर्फ अभिमन्यू चंद्रशेखर शिंदे (वय ३२, निराळे वस्ती, मुरारजी पेठ, सोलापूर), रविराज दत्तात्रेय शिंदे (वय ३२), प्रशांत ऊर्फ आप्पा पांडुरंग शिंदे (वय ३६, दोघे रा. शाहीर वस्ती, भवानीपेठ, सोलापूर), नीलेश प्रकाश महामुनी (वय ४५, रा. दत्त चौक, सोलापूर), तौसीफ गुडूलाल विजापुरे (वय २७, रा. मेहताबनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) आणि विनित ऊर्फ ईश्वर भालचंद्र खाणोरे (वय ३१, रा. पुणे) या सात आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी दोषी धरून जन्मठेप आणि इतर कलमांखाली शिक्षेसह प्रत्येकी १७ हजार रुपये दंड ठोठावला.

raosaheb danve on loksabha result
“शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले, त्यांना वाढायला मीच होतो”; रावसाहेब दानवेंचं विधान चर्चेत!
Tourist drowned in Alibaug sea
अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला
Read Special Article on Dombivli blast and fire Incidents
डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!
medical sangli 20 people poisoned after eating Puranpoli Amras
पुरणपोळी-आमरसच्या जेवणानंतर २० जणांना विषबाधा
As soon as the code of conduct is over there is a rush of protest at the satara collector office
सातारा: आचारसंहिता संपताच जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची गर्दी; प्रशासनाच्या बारनिशी मध्ये निवेदनांचा खच
Decision to intensify agitation of Shaktipeeth affected farmers to oppose Shaktipeeth highway
शक्तीपीठ महामार्ग अधिसूचनेची होळी, आंदोलन तीव्र करणार
Rupali Thombre sushma andhare
रुपाली ठोंबरे ठाकरे गटात प्रवेश करणार? फोनवरून चर्चेनंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, “त्या अस्वस्थ असून…”
Solapur is not in the banana production list despite having a large share in banana exports
केळी निर्यातीत मोठा वाटा असूनही सोलापूर केळी उत्पादन सूचीत नाही
Raj Thackeray
मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच! पक्षांतर्गत निवडणुकीत झाला ठराव, ‘या’ वर्षांपर्यंत राहणार पदावर!

हेही वाचा – सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

पत्रा तालीम आणि पाणीवेस तालमीत २००४ साली शिवजयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यातूनच पाणीवेशीतील सुरेश ऊर्फ गामा पैलवान याचा मुलगा ऋतुराज याचा खून झाला होता. त्या खटल्यात पत्रा तालमीच्या सत्यवान ऊर्फ आबा कांबळे याच्यासह दहाजणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु २०१४ साली मुंबई उच्च न्यायालयात अपिलामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे गामा पैलवान व त्याचै साथीदार चिडले होते. मृत आबा कांबळे हा डाळिंबी आडजवळ मोबाईल गल्लीत मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करीत होता. ७ जुलै २०१८ रोजी तुरळक पाऊस पडत असताना आबा कांबळे हा दुकानाजवळ आडोशाला थांबला असताना दुचाकी गाड्या उडवत आलेल्या आरोपींनी आबा कांबळे याच्यावर कोयत्यांनी हल्ला केला. तेव्हा जीव वाचविण्यासाठी तो पळत असताना पाठलाग करून त्याच्यावर सपासप ५६ वार करण्यात आले.

हेही वाचा – महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप

ही सर्व थरारक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती. मृत कांबळे याचे रक्ताने माखलेले कपडे, गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यावरील रक्ताचे डाग तपासले असता ते मिळतेजुळते निघाले. सीसीटीव्ही फुटेजचा अस्सलपणा पुढे आला. या खटल्यात २८ साक्षीदार तपासले गेले. यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप, तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. दीपाली काळे, फिर्यादी शुभम धुळराव तसेच वैद्यकीय आणि रासायनिक पृथःकरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत तर आरोपींतर्फे ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. झुरळे यांनी काम पाहिले.