सोलापूर औद्योगिक व व्यापारी विकासाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून सोलापूरचा गाजावाजा होत असला, तरी पायाभूत दळणवळण, उच्च शिक्षण आणि पारंपरिक रोजगार या तिन्ही आघाड्यांवर सोलापूरकरांची प्रतीक्षा कायम आहे. हजारो कोटींच्या घोषणा केवळ कागदावरच असून, प्रत्यक्ष सुरू झालेली सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा ठप्प आहे. तर, कष्टकर्यांtच्या मुलांसाठीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासकीय दिरंगाईत अडकले आहे.

‘गारमेंट पार्क’ तर केवळ प्रस्तावातच अडकलेले आहे. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली विमानसेवा पुन्हा संकटात सापडली आहे. गोवा आणि मुंबई सेवेला उत्तम प्रतिसाद मिळूनही जुलैमध्ये पावसाचे, तर आता इंधन दरवाढ व तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत सेवा बंद करण्यात आली. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित कंपनीला सेवा सुरू झालीच पाहिजे, याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एक-दीड महिना सुरू असलेली विमानसेवा आता कंपनीने पुन्हासोलापूरसाठी हजारो कोटींचे नियोजन, पदरी प्रतीक्षाच ! बंद केली आहे. ९ सप्टेंबरला मुंबईत होणार्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

शासकीय अभियांत्रिकीची रखडपट्टी

कामगारांच्या पाल्यांसाठी ५ मे २०२६ रोजी जाहीर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यंदाही सुरू होऊ शकले नाही. शासन निर्णय (जीआर) काढून श्रेयाचे राजकारण झाले; मात्र ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ची (एआयसीटीई) तांत्रिक मान्यता मिळवण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरले. १९६६ मध्ये सोलापूरला मंजूर महाविद्यालय राजकीय कुरघोडीत कराडला गेले. त्यानंतर तीनदा सर्वेक्षण झाले. सोलापूरनंतर २०२५ मध्ये लातूरचे महाविद्यालयाची घोषणा झाल्यांतर प्रत्यक्षात सुरू देखील झाले. पण, प्रत्यक्षात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरूच झाले नाही.

गारमेंट पार्क केवळ प्रस्तावात

शहरात सुमारे ४०० कोटींची उलाढाल असणारा गारमेंट उद्योग असून, २०० हून अधिक युनिफॉर्म ब्रँड कार्यरत आहेत. महापालिका- जिल्हा परिषद निवडणुकीतीलविजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरसेवक, सदस्यांचा मे २०२६ मध्ये सत्कार सोहळा झाला. त्यावेळी सोलापुरात गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, ठोस कृती आराखड्याअभावी हा प्रकल्पही अधांतरीच आहे.

विडी उद्योग संकटात

शासनाने लागू केलेले प्रतिदिन ३७९ रुपये किमान वेतन परवडत नसल्याचे सांगत कारखानदारांनी तेलंगणात स्थलांतराचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तूर्तास स्थगित झाले असले, तरी ठोस तोडगा न निघाल्यास कापड गिरण्यांपाठोपाठ विडी कामगारांचे सोलापूर ही ओळखही पुसली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

’सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर : १९,००० कोटी
’रेल्वेचा तिसरा व चौथा ट्रॅक : २०,००० कोटी
’पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास कॉरिडॉर : ४,५०० कोटी
’वाहतुकीसाठी दोन उड्डाणपूल : १,००० कोटी
’माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क : ५० एकरांवर नियोजन

’प्रस्तावित प्रकल्पांबाबत प्रशासनस्तरावर बैठका सुरू

विमानसेवेचा खेळखंडोबा सोलापूरच्या विकासासाठी धोक्याची घंटा आहे. आज विमानफेर्याे रद्द होत आहेत; उद्या गुंतवणूक आणि रोजगार रद्द झाले तर जबाबदारी कोणाची? घोषणांचा खेळ थांबवून प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करावी. – केतन शहा, सोलापूर विकास मंच