सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. फेसबुक लाइव्ह सुरु असताना एका शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केलीय. राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी पंढरपूरमधील मगरवाडीमधील सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. शुक्रवारी सायंकाळी सूरजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२६ वर्षीय सूरजचा कीटकनाशक पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये सूरज पुन्हा जन्म मिळालाच तर शेतकरी म्हणून मिळू नये असं सांगताना दिसतोय. “माझं आयुष्य इतकच होतं. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीय, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो,” असं सूरज या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. सूरजने या व्हिडीओमध्ये कीटकनाशकाची बाटली दाताने उघडली आणि तोंडाला लावली. त्यापूर्वी त्याने सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाहीय असंही म्हटलं. या प्रकारानंतर सूरजला पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सूरजचा मृत्यू झाला.

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

तालुक्याच्या पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक मिलिंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजच्या मालकीची १.१५ एकर जमीन आहे. त्याचं कोणतं थकित वीज बीलही नव्हतं तरी त्याने का आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत. “आम्ही तपास करत आहोत,” असं पोलिसांनी म्हटलंय.

मागील काही दिवसांपासून थकित वीजबिलांच्या कारणांवरुन शेतकरी आणि वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीमधील संघर्ष या पट्ट्यामध्ये तीव्र झाल्याचं दिसत आहेत. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वीज कंपनीने त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र मागील काही दिवसांमध्ये या गावातील एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडिक करण्यात आलेला नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. या भागामध्येमागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे.

दक्षिण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा शुक्रवारी भडका उडाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विजेच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या एका कोपऱ्यात आंदोलन सुरू असल्याची टीका होत राहिली होती. त्यानंतर स्वाभिमानीने आक्रमक होत आंदोलकांची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.