सोलापूर : वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा घटनास्थळीच मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ घडली संतापजनक घटना

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

वाळूची वाहतूक करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने इशारा करूनही न थांबता, उलट पोलीस शिपायाला चिरडले. यात तो पोलीस शिपाई गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर वाळू वाहतुकीचा टेम्पो जागेवर न थांबता तसाच सुसाट वेगाने निघून गेला.

मृत सोनलकर हे लोकअदालतीसाठी संबंधित व्यक्तींना समन्स बजावत गोणेवाडी येथे आले होते. तेथे स्थानिक पोलीस पाटलाची वाट थांबले असताना तेथून अचानकपणे वाळू वाहतुकीचा टेम्पो जात होता. तेव्हा नजर पडताच सोनलकर यांनी तत्परतेने पुढे येऊन तो टेम्पो अडविण्याचा इशारा केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत टेम्पो तसाच पुढे जात असताना सोनलकर हे पुढे जाऊ लागले. तेव्हा टेम्पोचालकाने सोनलकर यांच्या अंगावर वाहन चालवले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पळून गेलेल्या चालकाचा शोध मंगळवेढा पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solapur policeman dies on the spot after being crushed by sand transport speed tempo msr

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी