कालवाडी – सोलापूर डेमू रेल्वेमध्ये सकाळी दहाच्या सुमारास सोलापूर स्थानकावर दाखल झाली. या रेल्वेमध्ये कलबुर्गी रेल्वे स्थानाकातून भाग्यश्री जमादार ही गर्भवती महिला कुटुंबासहीत सोलापूरला जाण्यासाठी प्रवास करत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर येऊन ही गाडी थांबल्यानंतर प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे त्यांच्या पतीने मदतीसाठी धावपळ सुरु केली. या महिलेचा आवाज लोहमार्ग पोलिसांनी ऐकताच प्रसंगावधान राखून स्ट्रेचरच्या साहाय्याने रेल्वे स्टेशनवरून महिलेला रुग्णवाहिकेत पोहंचवले आणि त्यानंतर त्या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच मदत केल्याने या गर्भवती महिलेला वेळीच उपचार मिळाले. या मदतीमुळे या महिलेचा जीव वाचला. नंतर या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पोलिसांच्या मदतीमुळे या महिलेला वेळीच दाखल करण्यात आल्याने जन्म झालेल्या मुलीचाही जीव सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सध्या महिला आणि बाळ दोघीही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

प्रल्हाद चव्हाण, दीपक साळवी, विशाल कुलकर्णी आणि बालाजी नाबदे अशी या महिलेला आणि तिच्या पतीला वेळीच मदत करणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूतांची नावं आहेत. प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर रेल्वे स्थानकात पोलिसांनी केलेली मदत आणि सर्व घटनाक्रम सीसीटिव्हीमध्ये कैद झालाय. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सोलापुरात सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur railway police helped pregnant women scsg
First published on: 29-01-2022 at 11:03 IST