पुणे : यंदाच्या रब्बी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे ७६ हजार हेक्टरने घट झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी पेरणीच्या काळात परतीचा पाऊस सुरू होता. शिवाय दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू, मका, हरभऱ्याची पेरणी केली आहे. 

सन २०१६ ते २०२१ या काळात राज्यातील रब्बी हंगामातील ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७,३६,२८६ हेक्टर इतके राहिले आहे. त्यापैकी मागील वर्षी १३,६८,३८४ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यंदा १२,९२,४११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाचे क्षेत्र मागील वर्षांच्या तुलनेत ७५,९७३ हेक्टरने कमी आहे.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

राज्यात खरीप आणि रब्बी, अशा दोन्ही हंगामात ज्वारीची लागवड केली जाते. त्यापैकी रब्बीतील क्षेत्र जास्त आहे. कमी पावसाच्या, कोरडवाहू भागात ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जात होते. मात्र, यंदा परतीचा पाऊस ऑक्टोबरअखेपर्यंत सुरू होता. त्यामुळे वेळेत ज्वारीची पेरणी होऊ शकली नाही. सिंचन योजनांच्या पाण्यामुळे आणि मागील चार वर्षांपासून मोसमी पाऊस चांगला होत असल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी फळपिके आणि नगदी पिकांवर जास्त भर दिला आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

घट कुठे?

राज्यात दहा वर्षांपूर्वी खरीप हंगामात दहा लाख हेक्टर आणि रब्बी हंगामात सुमारे तीस लाख हेक्टरवर ज्वारी घेतली जायची. नगर, सोलापूर, बीड, परभणी, सातारा, जालना, नंदुरबार या जिल्ह्यांत ज्वारीचे क्षेत्र मोठे होते. मात्र, याच जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटले आहे. एकटय़ा नगर जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी सुमारे सहा लाख हेक्टरवर ज्वारी होत होती. मागील वर्षी नगरमध्ये २ लाख १० हजार हेक्टरवर ज्वारी होती, तर यंदा १ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून चांगला पाऊस होत असल्यामुळे आणि सिंचनाच्या सुविधा वाढल्यामुळे कोरडवाहू क्षेत्र घटले आहे. शेतकरी गहू, हरभरा, कांदा, मका पिकांकडे वळत आहेत. जनावरांची संख्या कमी होत असल्यामुळे चारा म्हणूनही ज्वारीची गरज कमी होऊ लागली आहे. परिणामी क्षेत्रात घट होत आहे.

– विकास पाटील, संचालक विकास आणि विस्तार

ज्वारीमधील प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. फक्त भाकरीसाठी ज्वारीचा वापर न करता, ज्वारीचे पोहे, शेवया, नूडल्स, पास्ता, बिस्किटांसह अन्य बेकरी पदार्थ तयार केले पाहिजेत. ज्वारीपासून रेडी-टू-इट पदार्थाची निर्मिती करून आहारातील ज्वारीचे प्रमाण वाढविले पाहिजे. 

डॉ. सुरेश आंबेकर, ज्वारी अभ्यासक