प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची एक फेरी वाढविण्याच्या निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या विद्यमान थांबे, वेळापत्रकसह चालवल्या जाणार आहेत.
अकोल्याहून तिरुपतीसाठी विशेष गाडी १२ एप्रिल २०२६ रोजी धावणार आहे. तसेच नांदेड – तिरुचेंनुर गाडी क्रमांक ०७०१५ ही विशेष गाडी शनिवारी धावणार असून तिची सेवा ११ एप्रिल वाढविण्यात आली असून हीच गाडी पुन्हा ०७०१६ या क्रमांकासह तिरुचेंनूर पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही विशेष गाडी १२ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. धर्मावरम – नांदेड विशेष गाडी रविवारी धावणार आहे. तसेच जालन्याहून जालना – तिरुचेंनुर विशेष गाडी सोमवारी धावणार आहे. तिची सेवा १३ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीचा उलटा प्रवास दुसऱ्या दिवशी १४ एप्रिलपर्यंत वाढण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गाड्याची मागण्या वाढल्या असून तिरुपतीसाठी रेल्वेची मागणी वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेशातील गाड्याचे आरक्षणही काही मिनिटात संपून जाते. अयोद्धेतील राम मंदिराच्या दर्शनासाठी गाड्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या दक्षिण भारतातील तिरुपती दर्शनासाठी पुढील दोन -तीन दिवस विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर अनेक पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत परराज्यात फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे रेल्वेमधील गर्दी वाढली आहे.
रेल्वे आरक्षणातील डिजिटल व्यवहार वाढला
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील तिकिटाचा डिजिटल व्यवहार आता ७० टक्क्यांवर गेला असल्याचेही सांगण्यात आले आहे. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, आदिलाबाद या ठिकाणी जनजागृतीमुळे डिजिटल व्यवहार वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
