सोलापूर : अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा येत्या बुधवारी, १० एप्रिल रोजी आहे. तर ६ मे रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे. प्रकट दिन ते पुण्यतिथीपर्यंत २७ दिवस अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रकटदिनी मंदिरात पहाटे निर्गुण पादुकास अभिषेक, दुपारी पुष्पवृष्टी आणि पाळणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला लागूनच असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह लाखापेक्षा अधिक भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाणार आहे.

akola, Sri Rajarajeshwar Temple, Sri Rajarajeshwar Temple Excavation, Sri Rajarajeshwar Temple akola, 200 Year Old Subway Like Structure Unearthed, Excavation , marathi news, akola news,
खोदकामात २०० वर्ष जुनी इमारत आढळली; अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात जीर्णोद्धारादरम्यान…
Pandharpur Pad Sparsh Darshan
Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार
Sambhaji Maharaj Jayanti, Kolhapur,
कोल्हापुरात संभाजी महाराज जयंती सोहळ्यात १२ तास लाठीकाठीचा उपक्रम
High participation of Shiv lovers in Durbar procession of Shiv Jayanti in karad amy 95
शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीत शिवप्रेमी जनतेचा उच्चांकी सहभाग; शिवमय कराडनगरीत छत्रपती शिवरायांचा जयघोष
Kolhapur, Parshuram Jayanti, Parshuram Jayanti Celebrated in Kolhapur, Shri Parshuram Palkhi Procession, Kolhapur news, parshuram Jayanti news, marathi news,
सूर्यास्ताच्या साक्षीने कोल्हापुरात परशुराम जयंती; पालखी मिरवणूक उत्साहात
sandal paste on mahadev s pind in dhaneshwar temple
चिंचवडमध्ये प्राचीन धनेश्वर मंदिरात महादेवाच्या पिडींवर चंदनाचा लेप; अशी आहे आख्यायिका!
govind dev giri maharaj latest marathi news
स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती
Vatavriksha Swami Samarth 146th Death Anniversary Ceremony in Akkalkot
अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी समर्थ १४६ वा पुण्यतिथी सोहळा

हेही वाचा…राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी वटवृक्ष मंदिरात गुढी पाडव्यानिमित्त मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या निर्गुण पादुकांस अभिषेक करण्यात येणार असून सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत सत्रात मंदिर समितीच्या विश्वस्त उज्ज्वला सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली मंदिरातील ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळाच्यावतीने श्रींच्या पाळण्याचे भजन होणार आहे. नंतर पाळण्यावर गुलाल व पुष्पवृष्टी होणार आहे.

यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना भाविकांना उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मंदिराच्या दक्षिण महाद्वारापासून मुरलीधर मंदिरापर्यंत दर्शन रांगेत मंडप उभारण्यात येणार असून भाविकांना उष्म्यापासून दिलासा म्हणून शीतपेयांचेही वाटप केले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी ही माहिती दिली. दुपारी मंदिर समितीच्या मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील भक्तनिवास भोजन कक्षात भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

हेही वाचा…“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते पुण्यतिथीपर्यंत, १० एप्रिल ते ६ मे पर्यंत २७ दिवस वटवृक्ष स्वामी मंदिरात नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अक्कलकोटच्या समर्थ नगरी परिवाराने आयोजिलेल्या या नामजप सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.