संपावर तोडगा निघत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विवंचनेतून प्राशन केले विष

संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने खामगांव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

ST-Bus-2-2
(प्रातिनिधीक छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने खामगांव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी माटरगांव येथे उघडकीस आली.

शेगांव तालुक्यातील माटरगांव येथील ३१ वर्षीय विशाल प्रकाश अंबलकार हे खामगांव आगारात यांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. गेल्या १० दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मांगण्यासाठी संप सुरू आहे. मात्र या संपावर आतापर्यंत राज्य सरकार कडुन कोणताही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे काय होणार? तसेच मी सुध्दा निलंबित होणार का? या विवंचनेतून विशालने १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही बाब नातेवाईकांना कळताच त्यांनी तात्काळ त्यास खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगांव आगारातील कर्मचारी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले आहे.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St employee attempted suicide in buldana hrc

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या