ST workers strike : सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठक संपली ; अनिल परब म्हणाले…

सह्याद्री अतिथीगृहावर परिवहनमंत्री अनिल परब व एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्यात आज बैठक झाली.

anil parab
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत, मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. परिणामी सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यांमाना या बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली.

अनिल परब म्हणाले, “समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं? यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली. ”

तसेच, “यावर त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत. त्यांचा बऱ्याच दिवसांपासूनचा वेतन वाढीचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे. साधारण सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे, की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, किती त्यावरती आपण बोझा घेऊ शकतो? इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असं मी सांगितलेलं आहे.” असं परब यावेळी म्हणाले.

याचबरोबर, “त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत शासानाने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता कामगारांशी चर्चेसाठी ते(कामगारांचं शिष्टमंडळ) गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. संपकरी कामगारांनी संप लवकरात लवकर संप थांबवून कामावर येण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असतान आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी अत्यंत नुकसानीत आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे.” असं आवाहन देखील परिवहनमंत्र्यांनी केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St workers strike important meeting at sahyadri guest house ended anil parab said msr

ताज्या बातम्या