सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या येथील सय्यदबाबांचा उरूस उद्यापासून (शनिवार) सुरू होत आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले असून दर्ग्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
उद्या सकाळी १०.३० वाजता फकिरांची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर दग्र्यात धार्मिक परंपरेनुसार फातेहाख्वानीचा कार्यक्रम होईल. सायंकाळी दग्र्यापासून तहसील कचेरी, पोलीस ठाणे यांच्या चादरीची मिरवणूक काढण्यात येईल. मानाची डावखर कुटुंबाची चादर मिरवणुकीने दग्र्यावर आणण्यात येईल. शनिवारी पहाटे चादर चढवून संदलच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. दिवसभर मिरवणुकीने येऊन चादरी चढविल्या जातील. मुर्शद अन्वरअली शाह यांच्यावतीने प्रसादाचे वाटप केले जाईल. माधव केतकर हजरत मोईन मियाँ, खलीफे रफाई, हजरत सय्योदिनमियाँ रफाई हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. या वेळी रात्रभर दग्र्याच्या आवारात मिलाद पठण होणार आहे. तसेच फकिरांच्या जरबचा कार्यक्रम होईल.
रविवारी सायंकाळी जमील शकील अजमेरी व फैयाज वारसी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम तर सोमवार (दि. ७) राम-रहिम उत्सव समितीच्या वतीने जयपूर येथील शमीम नईम अजमेरी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उरूस समितीचे अध्यक्ष मुन्ना पठाण, दिलावर गुलाम रब्बानी आदी प्रयत्नशील आहेत.