scorecardresearch

राज्यात उन्हाच्या झळा कायम; पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाऊस

सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

पुणे : उत्तरेकडील राज्यांत अद्यापही उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याने आणखी दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील तापमानवाढ थांबण्याची चिन्हे नाहीत. उन्हाचा चटका कायम असताना पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारीही काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

उत्तर-पश्चिम भारतामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेची स्थिती आहे. उत्तरेकडे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशपासून पंजाब, दिल्ली, हरियाणात उष्णतेची लाट आहे. राजस्थानमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने अतितीव्र स्वरूप घेतले आहे. या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही प्रामुख्याने विदर्भात सध्याही उष्णतेची लाट कायम आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र कमाल तापमान अद्यापही ४१ अंशांपुढे आहे. रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातही तापमानाचा पारा ४० अंशांवर गेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State continues to experience heat waves rain in western maharashtra zws

ताज्या बातम्या