राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत असल्याचं दिसत आहे. मात्र गुरुवारी करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज २,३४३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१३,४१८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,३८४ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०६,८३,५२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८६,२८०(१०.८५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,२४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण २९,५६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात ५४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२५,६१९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. करोना दुप्पटीचा वेग हा १,१५१ दिवसांवर पोहोचला आहे. ७ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.