राज्यात करोनाची लाट ओसरत असताना गेल्या दोन दिवसात करोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे. आज दिवसभरात ५ हजार १०८ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ४ हजार ७३६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०४ टक्के इतकं झालं आहे. दुसरीकडे आज राज्यात १५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत.

  • २५ ऑगस्ट: राज्यात ५ हजार ०३१ नवीन करोनाबाधित आढळले होते. ४ हजार ३८० रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर, २१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.
  • २४ ऑगस्ट: राज्यात ४ हजार ३५५ नवीन करोनाबाधित आढळले होते. ४ हजार २४० रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर, १९९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली होती.
  • २३ ऑगस्ट: राज्यात ६ हजार ७९५ रूग्ण करोनातून बरे झाले होते. तर ३ हजार ६४३ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. तर, १०५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला होता.
  • २२ ऑगस्ट: राज्यात ४ हजार १४१ नवीन करोना रुग्ण आढळले होते. तर १४५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ७८० करोना रुग्णांनी करोनावर मात केली होती.
  • २१ ऑगस्ट: राज्यात दिवसभरात १४५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. तर, ४ हजार ५७५ नवीन करोनाबाधित आढळून आले होते. याचबरोबर ५ हजार ९१४ रूग्ण करोनातून बरे देखील झाले होते.

मुंबईत आज दिवसभरात ३९७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के आहे. तर दिवसभरात ७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४२ हजार ४०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत एकून १५ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ९० लाख ६० हजार ४२३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान करोना रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका होता. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,८२५ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सक्रिय रुग्ण संख्या असलेल्या २४ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत.