पेण अर्बन बँक घोटाळ्यातील जमिनी सिडकोला विकत घेण्याचे आदेश – मुख्यमंत्री

ननाचा नकाशा तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच अंतिम मंजूरीसाठी ठेवला जाईल.

devendra fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण अर्बन घोटाळ्यातील नना क्षेत्रात येणाऱ्या जमिनींची सिडकोमार्फत खरेदी करण्याचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत. या व्यवहारातून जमा होणाऱ्या रकमेतून ठेवीदारांची देणी दिली जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते कर्जत येथे माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, राज्यमंत्री रिवद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.

पेण अर्बन बँक घोटाळ्यामुळे खातेदारामध्ये अस्वस्थता आहे. पण खातेदारांना दिलासा मिळावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. मात्र बँक घोटाळ्यातील जप्त झालेल्या जमिनींना योग्य दर मिळत नसल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेऊन या जमिनींची सिडकोमार्फत खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नना क्षेत्रात मोडणाऱ्या जमिनींची यात खरेदी केली जाणार आहे. ननाचा नकाशा तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच अंतिम मंजूरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर या जमिनी सिडकोकडे  समाविष्ट होतील. आणि त्याला उचित किंमतही मिळेल. या पशातून ठेवीदांरांची देणी दिली जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

रायगड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. या विकासाला साथ देण्याचे काम राज्यसरकार करते आहे. या विकास प्रक्रियेला साथ द्या .असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षांवर त्यांनी यावेळी सडकून टिका केली. या दोन्ही पक्षांची अवस्था ‘जल बीन मछली ’ प्रमाणे झाली आहे. सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी काही केले नाही .आणि आज हल्ला बोल करत फिरत आहेत. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २००४ साली प्रसिद्ध  झाला. २०१४ पर्यंत यांची केंद्रात व राज्यात सत्ता होती. तेव्हा या आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत. असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई -न्हावा शेवा सििलकचे काम गेले वीस वर्षे हे काम रखडले होते. तीन वर्षांत सर्व मंजुऱ्या मिळवून हे काम सुरु झाले आहे. कर्जत पनवेल रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरु व्हावी यासाठी रेल्वे मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक लावली जाईल. एमएमआरडीएच्या माध्यमातून रायगडच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पेण अर्बन बँकेचे ठेवीदार मात्र नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले तरी ठेवीदारांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.  आश्वासने नको ठोस कारवाई हवी .अशी भूमिका पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीने घेतली आहे. यापूर्वीही अशी आश्वासने मिळाली होती. परंतु काहीच झाले नाही .सरकारी यंत्रणेला याबाबत काही देणंघेणं नाही . सिडकोही याकडे दुर्लक्ष करीत असून सिडकोने या जमिनींची अल्प  किंमत लावली असल्याचे ठेवीदार संघर्ष समितीचे अध्याक्ष नरेन जाधव यांनी सांगितले .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: State government order cidco to buy land in pen urban banks scam say devendra fadnavis

ताज्या बातम्या