महावितरण कंपनीतर्फे राज्यात पायाभूत आराखडा त्याचप्रमाणे स्वतंत्र गावठाण फिडर योजना राबविण्यात येते. या प्रकल्पांचा मूळ मंजूर खर्च ११,४९०.४६ कोटी रुपये इतका होता. त्यात २,३८४ कोटी रुपये वाढ झाली असून, या वाढीव खर्चाच्या २० टक्के प्रमाणे ४७७ कोटी रुपये शासनाच्या भागभांडवलास मंजुरी देण्यात आली. 
या प्रकल्पांचा आराखडा २००६-०७ मध्ये त्यावेळच्या कॉस्ट डाटानुसार तयार करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात २००८ साली कामास सुरुवात झाली. त्यावेळच्या जागेच्या उपलब्धतेनुसार, तसेच उपकरणांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मूळ मंजूर किंमत वाढून ती १३,८७४.४५ कोटी इतकी झाली. त्या अनुषंगाने ही मान्यता देण्यात आली आहे.