मुंबईतील वसईमध्ये भररस्त्यात आज एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरातून संत्पत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वालीव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी संवाद साधत आरोपीवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रुपाली चाकणकर यांनी म्हटलं?

“आज वसईमध्ये भरस्त्यात एका तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामध्ये कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.

amol mitkari warning to bjp
“…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल”, अजित पवार गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Notice to eight more people by District Collectors in Zhadani case
सातारा: झाडानी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणखी आठजणांना नोटीसा, २० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
vijay wadetiwar
“तुकाराम मुंढेंची बदली आता थेट अमेरिका किंवा चीनला करा”, विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका!
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”

हेही वाचा : वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भक्कम पुराव्यानिशी…”

“या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषाआरोप पत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन व हत्येपर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल”, असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे.

नेमकं घटना काय?

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) याचे एका मुलीवर मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र प्रेयसी अन्य मुलांशी बोलत असल्याचा संशय रोहितला होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. रोहितची प्रेयसी वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील परिसरात रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला. वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले.