करोनामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली.

state-election-commission1
करोनामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित (फोटो-संग्रहीत)

देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी ही माहिती दिली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधली पोटनिवडणुकसाठी मतदान होणार होते. मात्र करोनाचं संकट पाहता या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीसााठी १९ जुलैला मतदान होणार होतं. मात्र ७ जुलैला राज्य शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती. ६ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाने सरकारकडे अहवाल मागितला होता. यात करोनाबाबतची अधिकची माहिती आणि सविस्तर अहवाल मागितला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी असलेली आचारसंहितादेखली शिथिल करण्यात आली आहे.

कोणाला माहित होतं ५५- ५४ आमदारांवर मुख्यमंत्री होईल – संजय राऊत

राज्यातीतील करोनी स्थिती सुधारल्यानंतर पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडले जातील, असंही राज्य निवडणूक आयोगने स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: State zilla parishad panchayat samiti by elections postponed due to corona rmt