धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सवलती जाहीर करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघटनेच्यावतीने शनिवारी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व क्रीडा युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी या तिन्ही मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील धनगर समाजाचे लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
िबदू चौक येथे दुपारी बाराच्या सुमारास धनगर समाज क्रांतिकारी संघ, कोल्हापूर जिल्हा धनगर आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे तिन्ही मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. १६ आणि २४ जुल या दोन्ही दिवसांच्या मंत्रिमंडळाच्या बठकीत धनगर समाजाला आरक्षण जाहीर करण्यावरून मतभेद झाले. यावेळी चच्रेत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड व क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी विरोध करून आरक्षण देण्यास नकार दर्शविला. त्याचे पडसाद राज्यभरासह कोल्हापुरातही उमटले. ‘अबकी बार जय मल्हार’, आरक्षणास विरोध करणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी विलासराव वाघमोडे, प्रा. राजेंद्र कोळेकर, मिच्छद्रनाथ बनसोडे, बाळासो मोटे, धोंडिराम सिद, संजय अनुसे, संजय खोत, रामभाऊ डांगे, बाबासो सावगावे, अनिल पुजारी आदीं उपस्थित होते.