अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहराजवळी समनापूर गावात दोन गटात तुफान राडा झाला. भगवा मोर्चावरून परत येणाऱ्या काही तरुणांनी समनापूरमध्ये दगडफेक केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या दगडफेकीत पाच गाड्यांचे आणि दोन मोटरसायकलचे नुकसान झाले. तसेच काही लोक जखमीही झाले.

संगमनेरमधील भगवा मोर्चावरून परतत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डी. वाय. एस. पी. सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी

समनापुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेनंतर समनापुरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

“समनापूरमध्ये समाजकंटकांनी १-२ गाड्यांच्या काचा फोडल्या”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, “संगमनेरमध्ये एक मोर्चा होता. तो मोर्चा दुपारी १२ वाजता संपला. त्यानंतर लोक आपआपल्या घरी परत जात असताना संगमनेरपासून ५-६ किलोमीटर अंतरावरील समनापूर गावात काही समाजकंटकांनी १-२ गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यात काही लोक जखमी झाले.”

हेही वाचा : अहमदनगरमधील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, “धर्माच्या नावाने…”

“दोषींवर कडक कारवाई केली जाईल”

“या प्रकरणातील दोषींचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता समनापूरमध्ये शांतता आहे. कुणीही अफवा पसरवू नये. या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे,” असंही राकेश ओला यांनी नमूद केलं.