राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.

“गुरूवारी ( ८ जून ) ४ ते ४.१५ च्या दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू,” असं सुनील राऊत यांनी सांगितलं.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Gautam Navlakha
नजरकैदेत ठेवण्याची मागणी गौतम नवलखांना पडली भारी; एनआयएनं दिलं १.६४ कोटींचं बिल

हेही वाचा : “औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजपा-मिंधे सरकारच्या मुडद्यात…”, ठाकरे गटाचं टीकास्र

“संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी…”

“गेले अनेक दिवस झाले, अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारला त्याची जाणीव करून दिली आहे. पण, सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचं वाटतं,” असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, ‘या’ मुद्द्यावर ‘मुंब्रा बंद’चा इशारा

“जर काही झालं, तर त्याची जबाबदारी…”

शरद पवारांना मिळालेल्या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय. जर काही झालं, तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल”, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला.