दादा, बाबा, राम वगैरे नंबर प्लेटवर लिहिणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. भविष्यात ई-चलन सुविधेद्वारे नंबर प्लेट दृष्टिक्षेपात आल्याबरोबर दोषींच्या हाती चलन पडेल, अशी सोय केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या लक्षवेधीवर दिली.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरात सिग्नल नसणे, चालकांची बेफिकिरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यप्राषन करून वाहन चालवणे, चुकीच्या व विना नंबर प्लेटची वाहने रस्त्यावरून चालवणे हे प्रकार सुरु आहेत. शिवाय वाहन चालवताना मोबाईलचा वापर, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात माल वाहून नेणे, यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ तर झालीच आहे. पण वाहतूक खोळंबल्याने अनेक समस्या निर्माण होतात.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ७४३ चौरस किलोमीटर असून दोन्ही शहरांची मिळून साधारण लोकसंख्या ६० लाखांवर आहे.