अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीतच संघर्ष!

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या अन्य दोन घटक पक्षांना जिल्हा बँकेच्या सत्तेतही वाटा हवा आहे.

|| मोहन अटाळकर
अमरावती :  महाविकास आघाडीत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या निवडणुकीच्या निमित्ताने फुटीचे चित्र समोर आले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा प्रबळ होत चालल्याने आघाडीतच संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसच्या वर्चस्वाखालील ही बँक ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते एकवटले आहेत.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके वर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे वर्चस्व राहिले. त्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकू र यांची साथ लाभली. सद्य:स्थितीत जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात आहे. हे वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान या तीन नेत्यांसमोर आहे.

आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या अन्य दोन घटक पक्षांना जिल्हा बँकेच्या सत्तेतही वाटा हवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके  यांनी थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेऊन प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या साथीने त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पवित्रा घेतला आहे. त्यातूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. सहकारात राजकीय भूमिका बाजूला ठेवाव्या लागतात, हे स्पष्टपणे सांगून राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, प्रहारचे नेते ‘कामाला’ लागले आहेत. प्रस्थापितांना हटवा, हेच लक्ष्य ठेवून विरोधकांची मोट बांधली जात आहे.

या निवडणुकीत पॅनेलच्या नावांची घोषणा झाली नसली, तरी सत्तारूढ गटाचे सहकार पॅनेल आणि विरोधी गटाचे परिवर्तन पॅनेल निवडणुकीत लढत देतील, असे चित्र आहे. सहकार पॅनेलचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे पालकमंत्री यशोमती ठाकू र करीत आहेत, तर परिवर्तन पॅनेलची धुरा संजय खोडके  आणि बच्चू कडू यांच्या खांद्यावर आहे. भाजपचे आमदार प्रताप अडसड, प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे हे मैदानात उतरले आहेत.

परिवर्तन पॅनेलचे संयोजक संजय खोडके  यांनी निवडणूक लढवू नये, असा एका गटाचा आग्रह होता. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके  या काँग्रेसच्या आमदार असल्याने चांगले संके त जाणार नाहीत, असे या गटाचे म्हणणे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून खोडके  यांचे मतपरिवर्तन करावे, असाही प्रयत्न झाला. पण, खोडके  हे आपल्या भूमिके वर ठाम होते. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीत पक्षाचा संबंध नसल्याचे सांगत खोडके  यांच्या गटाने आघाडीची शक्यता फे टाळून लावली.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. सत्ताधारी बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांना त्यांनी पाठबळ दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व परिवर्तन पॅनलचे संयोजक संजय खोडकेंच्या सोबत आहेत. आमदार प्रताप अडसड, प्रकाश भारसाकळे, राजकुमार पटेल यांच्या विरोधात आमदार बळवंत वानखडे सक्रिय आहेत. यातच राजकु मार पटेल यांचे नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याने विरोधकांना धक्का बसला आहे.

गैरव्यवहाराचे आरोप

गेल्या काही महिन्यांपासून बँके तील कथित गैरव्यवहाराचे आरोप सुरू आहेत.  प्रताप अडसड यांनी यानिमित्ताने सत्तारूढ गटाला लक्ष्य के ले आहे. जिल्हा बँकेने व्याज आणि नफा मिळविण्यासाठी म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. नियमानुसार बँकेनेच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे होते. मात्र, संचालक मंडळाला अंधारात ठेवून प्रशासनाने गुंतवणुकीत समन्वयाने एजंट नेमल्याचा आरोप झाल्याने बँकेचे ऑडिट करण्यात आले होते. बँके च्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. आता या प्रकरणात ‘ईडी’चाही प्रवेश झाला आहे.

जिल्हा बँके च्या निवडणुकीत दोन पॅनेल एकमेकांच्या विरोधात असले, तरी ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सध्या एकमेकांवर दोषारोप करून आपली पोळी शेकू न घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा पाया बांधल्या जात असतो. नवीन आघाडी तयार करून योग्य प्रतिनिधी बँके वर पाठविण्याचा निर्णय घ्यावा. मतदारांनी सावधपणे मतदान करायला हवे. – धनंजय काकडे, विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना

जिल्हा बँक, बाजार समित्यांच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांनाच मताचा अधिकार देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता. पण, महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्दबातल के ला. त्याबद्दल कु णीही आवाज उठवला नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे विविध पक्षांचे नेते सहकार क्षेत्राची निवडणूक आली की पक्षीय भूमिका विसरून एकत्र येतात. या निवडणुकीत उभ्या ठाकलेल्या आमदारांनी माघार घ्यावी, अशी  अपेक्षा आहे.  – अरविंद नळकांडे, अध्यक्ष,  श्रमराज्य परिषद

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Struggle between congress and ncp in amravati district bank elections akp

ताज्या बातम्या