बीड : “तुला जास्त ताण होत असेल, तर एखादे वर्ष जाऊ दे”; पालकांच्या समजुतीनंतरही सीएचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सनदी लेखापाल (सीए) होण्याचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरातील शिवतेज कॉलनी येथे घडली.

suicide-main
प्रातिनिधिक छायाचित्र

बीड : सनदी लेखापाल (सीए) होण्याचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरातील शिवतेज कॉलनी येथे घडली. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. वरद मनोजसिंग जव्हेरी (वय २१) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वरदने मंगळवारी (२४ मे) रात्री उशिरा राहत्या घरात गळफास घेतला. वरद हा सनदी लेखापाल होण्यासाठी शिक्षण घेत होता. “तुला जास्त ताण होत असेल, तर एखादे वर्ष जाऊ दे. मात्र, ताण घेऊ नको”, असे त्याला पालक सांगत होते. याच तणावातून मंगळवारी रात्री उशिरा घरात कोणी नसल्याने वरद याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा : सोलापूर : आलेगावात महिलेसह दोघा चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू, आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय!

याप्रकरणी मृत वरदचे चुलते संतोष जव्हेरी यांनी दिलेल्या माहितीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student preparing for ca exam commit suicide in beed pbs

Next Story
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : राज्यपाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी