वाई : कोयना नदीवरील धरणाच्या शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने पाण्यात बुडालेल्या गावांचे, घरांचे, मंदिरे, देवांच्या मूर्ती, जुनी बामनोली बाजारपेठ, दगडी पूल, जुनी दळणवळणाची साधने आदी अवशेष खुले झाले आहेत. यामुळे या परिसरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

कोयना धरण निर्मितीपूर्वी कोयना भाग १०५ गावांची बाजारपेठ म्हणून समजल्या जाणाऱ्या कसबे मंदिरांसह बामनोली बाजारपेठ दगडी पूल उघडे, घरे ही झाली खुली. कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाने तळ गाठला असून या शिवसागर या जलाशयात गेलेल्या जुन्या घरांचे अवशेष जुन्या घरांचे मंदिरांचे देवीच्या मूर्ती जुनी बामनोली बाजारपेठ दगडी पूल आदी अवशेष दिसू लागले आहेत. जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच गावांच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत. या गावची पूर्ण पेठ पूर्णपणे बाजारपेठ दिसावयास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा…“राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणेच लोकसभेतही…”, संजय राऊतांनी वर्तविली टीडीपी, जेडीयूत फोडाफोड होण्याची शक्यता

गावाच्या मध्यभागी असलेले श्री भैरवनाथाचे मंदिर व त्या सभोवतांची त्याच गावांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या बारा बलुतेदार समाजातील घटकांची घरे त्यांचे चौथरे आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत आजूबाजूला असणाऱ्या पानवडी, बामणवाडी या वाड्यांसह इतरही वाड्या दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे बामनोली येथून तालुक्याच्या ठिकाणी मेढ्याला जाण्यास जुन्या काळातील कोयना नदीवरील दगडी पूल देखील दिसू लागला आहे. ज्या ज्या वेळी कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळी पूर्णपणे क्षमतेने घटते त्यावेळी हे अवशेष जमिनीबाहेर दिसू लागल्याने या संपूर्ण परिसरातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पुनर्वसित झालेले लोक आपले जुने गाव मंदिर पाहण्यासाठी आवर्जून गावाकडे येत असतात.

हेही वाचा…Petrol-Diesel Price in Maharashtra: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? विकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या तुमच्या शहरांतील आजचे दर

बामनोली गावासह कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय पातळीमध्ये ही गावेबोडीत क्षेत्रात गेली व त्याचे पुनर्वसन झाले. त्या पुढील क्षेत्रातील गावांचे अवशेष यामध्ये मंदिरे घरे मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात झाल्याने त्या त्या गावातील पुनर्वशी झालेली लोक महिलांनी पायपीट करून त्या अवशेषा पर्यंत पोहोचत आहे. तेथील मंदिर देवदर्शन घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच लुप्त झालेल्या संस्कृती खुणा परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.