नगर: संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या पूर्ण भारतीय बनावटीच्या ‘लेसर गाईडेड’ रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची (लेसर गायडेड अँटीटँक गायडेड मिसाईल-एटीजीएम) भारतीय लष्कराच्या वतीने नगर शहराजवळील ह्णकेके रेंजह्णह्ण या युद्धसराव क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी दूर अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची चाचणी याच सराव क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर आता जवळच्या अंतरासाठी घेण्यात आलेली ही चाचणीही यशस्वी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय लष्करात मुख्य लढाऊ वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अर्जुन’ या रणगाडय़ावरून या चाचणीसाठी ‘एटीजीएम’ डागण्यात आले. केके युद्ध सरावक्षेत्र लष्कराच्या ह्णआर्मर्ड कार्प्स अँड स्कूल (एसीसी अँड एस) या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या अखत्यारीत नगर शहरापासून सुमारे २० किमी. अंतरावर आहे. याच सराव क्षेत्रात पूर्वी अर्जून रणगाडय़ाच्याही चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आता अर्जुनवरील १२० मिमी.च्या तोफेसाठी चाचण्या सुरू आहेत.

‘एटीजीएम’ची चाचणी काल, मंगळवारी घेण्यात आली. यावेळी एटीजीएम क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेत आपली परिणामकारकता दाखवून दिली. रणगाडय़ाच्या सुरक्षेसाठी ‘एक्सल्पोजिव्ह रिअ‍ॅक्टिव आर्मर’ (इरा) तंत्र वापरले जाते. त्याला भेदण्यासाठी ह्णएटीजीएमह्णह्णवर ह्णहाय एक्सप्लोजिव्ह अँटीटँक (हीट) बसवले गेले आहेत. याशिवाय ‘एटीजीएम’ वेगवेगळय़ा माध्यमातून डागता येईल अशा पध्दतीने विकसित करण्यात आले आहे. रणगाडय़ावर बसलेल्या ‘एटीजीएम’ने जमिनीलगतचे लक्ष्य भेदण्याचे आव्हान असते. मात्र अर्जुनवरून डागलेल्या ‘एटीजीएम’ने तेही साध्य केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ व भारतीय लष्कराचे यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातील ‘आत्मनिर्भर भारत’कडे टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले आहे. ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी ‘एटीजीएम’ विकसित करण्याच्या व त्याची चाचणी यशस्वी करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे. यामुळे अर्जुनची परिणामकारक क्षमता वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful test indian made anti tank missile drdo ysh
First published on: 30-06-2022 at 00:39 IST