शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेशी संर्घष होण्याचा प्रश्नच नाही, आता संर्घष राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी असेल, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> ‘औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!’ राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Former Jat MLA Vilas Jagtap resigns from BJP
जतचे माजी आ. जगताप यांचा भाजपचा राजीनामा, विशाल पाटलांचा प्रचार करणार
Arvind Kejriwal aap Rajkumar Anand resigns
अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, दिल्लीतल्या मंत्र्याचा राजीनामा, आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप करत म्हणाले…
Arvind Kejriwal Arrest
अरविंद केजरीवाल यांच्या आधी किती मुख्यमंत्र्यांना अटक झाली? राजीनामा देणं किती आवश्यक? कायदा काय सांगतो?

“उद्धव ठाकरे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी बहुमत गमावलं होतं. लोकशाहीत बहुमत गमावल्यानंतर राजीमाना द्यावा लागतो. लोकशाहीच्या संकेतानुसार राजीनामा द्यावा लागतो. त्यांच्याबद्दल निश्चितपणे याआगोदरही प्रेम होतं, भविष्यातही राहील. शिवसेनेशी संघर्ष होण्याचा प्रश्नच नाही. कारण त्यांचे आता फक्त १६ आमदार आहेत. संघर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी होईल,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा >> CM Uddhav Thackeray Resign: निरोपाच्या भाषणात नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे; वाचा त्यांचं राजीनाम्याचं भाषण

व्हिडीओ –

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी जनतेचे आभार मानत मुख्यमंत्री तसेच विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आभार मानले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ठाकरे यांनांच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम राज्यकारभार चालवण्यास सांगण्यात आले आहे.