Sudhir Mungantiwar : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर जवळपास आठ दिवस होऊन गेले, पण तरीही सत्तास्थापनेचा पेच सुटत नव्हता. अखेर महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हतं. पण अखेर आद मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत.

आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना संबोधि करताना २०१९ साली ज्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. यानंतर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही यावरून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करत एक सूचक विधान केलं. “उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा योग्य सन्मान झाला असता”, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”

हेही वाचा : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“आम्ही आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोद दिलं. तसेच एकमताने सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली. एकाही व्यक्तीने वेगळं मत व्यक्त केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त म्हणून ते काम करतील”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

उद्या किती जण शपथ घेतील?

महायुतीच्या सरकारमध्ये उद्या मुख्यमंत्र्‍यांच्या बरोबर दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील का? तसेच किती मंत्री उद्या शपथ घेतील? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना वाचारण्यात आला. यावर बोलताना मुनगंटीवार यांनी म्हटलं की, “मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे आउट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारू नका. हा अधिकार देवेंद्र फडणवीस यांचा असल्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

“देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईल या वाक्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. मात्र, ते पुन्हा आले. खरं तर अहंकार हा असाच जात असतो. शेवटी विरोधकांना अहंकाराचं फळ मिळालं. सच परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं”, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, आता उद्धव ठाकरे हे बैठक घेऊन हिंदुत्वाच्या मुद्यांवर कमी पडलो असं ते सांगत असून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत की, मुंबई महापालिका निवडणुका आहेत वैगेरे, या प्रश्नावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, “जब चिड़िया चुग गई खेत तब पछताए तो क्या फायदा. कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, काँग्रेसच्या बरोबर गेलात तर दुकान बंद होईल. मग आपल्या वडीलांचं ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर काय करायचं? जर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी विश्वास घात केला नसता तर आज त्यांचा सन्मान कायम राहिला असता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने सन्मान झाला असता, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader