"एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल बोलणं, हे..." मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र! | sudhir mungantiwar on uddhav thackeray statement on grandson of eknath shinde dasara melava rmm 97 | Loksatta

“एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल बोलणं, हे…” मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

“एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षांच्या नातवाबद्दल बोलणं, हे…” मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!
सुधीर मुनगंटीवार व उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलं होतं. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि आता नातू नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. यानंतर आता शिंदे गटासह भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख करून राजकारणाचा स्तर सोडला, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. ते चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, विजयादशमीच्या निमित्ताने भाषण देताना विचारांचं सोनं वितरीत होईल, असं आपल्याला वाटलं होतं. पण तिथे विचारांऐवजी सत्ता गेल्याचं मनामध्ये असलेलं दु:ख, राग व्यक्त झाला. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याबाबत निम्न शब्दांचा वापर करता करता त्यांची सत्ता कधी गेली, हेच त्यांना कळालं नाही.

हेही वाचा- Dasara Melava: १७९५ बसेससाठी १० कोटी कुणी भरले? कागदोपत्री तपशील देत अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

विजयादशमीचा उत्सव हा प्रेमाचा आणि आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी आपण वैर विसरून आनंद वाटत असतो. पण उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा उल्लेख केला, हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये आपण कोणत्या स्तरावर गेलो, याचं विश्लेषण जनता केल्याशिवाय राहणार नाही, असा टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एकनाथ शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यावरून नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या आई आणि पत्नी…”

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप
“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई महानगर क्षेत्रात गोवरचा उद्रेक; राज्यात दहा हजार संशयित रुग्ण
कलापिनी कोमकली यांच्याशी आज स्वरगप्पा
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती