वेदान्त-फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्त्यारोप सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राज्याच्या औद्योगिक धोरणांत काही बदल करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – वेदान्त प्रकरण : विधानसभेतील ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल; म्हणाले, “कोणाच्या दबावाखाली…”

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“आरोप करणाऱ्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही. त्यांचे राजकारण हे केवळ सत्तेचं असून आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, यासाठी आहे. स्वत:चं भाग्य उजळावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या भाग्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही”, असे प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

“नवे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी धोणांत काही बदल करण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे राज्यात अनेक मोठे प्रकल्प निश्चित येतील, याची मला खात्री आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वाबरोबर…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदान्त समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ‘वेदान्त ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदान्तने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली करत या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र, मंगळवारी वेदान्त समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.