बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक

जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाने ही कारवाई केली आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

साखर स्रमाट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचलनालयाने (DGGI) ही कारवाई केली आहे. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर ५२० कोटी रुपये ITC मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टेवर आहे. सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रत्नाकर गुट्टेंचा मुलगा सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनिअरींग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांची अफरातफर करुन बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटींच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात ५२० कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचं जाळं नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मेरठ, अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरलं आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्या प्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे.

सुनील हायटेक इंजिनीअर्स ही संपूर्ण भारतातील बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असल्याचं जीएसटी विभागाने म्हटलं आहे. सुनील गुट्टेशिवाय DGGI ने श्री ओशिया फेरो एलॉय प्रायव्हेट लिमिटेडच्या विजेंद्र विजयराज रांका यांनाही अटक केी आहे. या कंपनीवरही बोगस व्यवहाराचा आरोप आहे. गुट्टे आणि रांका या दोघांनाही अटक केल्यानंतर स्थानिक कोर्टात हजर करण्यातआले. या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sugar baron ratnakar gutte son sunil arrested in fake tax invoice scam by dggi scj

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या