scorecardresearch

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन; पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रुपये देण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आयोजन

संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रुपयांची मागणी केली आहे.

sugarcane farmers sit on dharna on highways
इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे रस्त्यावर ठाण मांडून बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

सांगली : उसाला पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळावेत, मागील हंगामातील उसाला चारशे रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता मिळावा, या मागणीसाठी रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक खंडित झाली. 

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे. मात्र, साखर कारखान्याकडून या मागणीला अद्याप अनुकूलता दर्शवण्यात आलेली नाही. शेतकरी

women empowerment (1)
महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे नवे अभियान; राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न
uran jasai villagers, jasai villagers protest against cidco, cidco plots to jasai villagers
जासई ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच सिडकोने चर्चेला बोलवलं, सोमवारी सिडको भवनात होणार चर्चा, साडेबारा भूखंडाचे निर्माते दिबांचे गावच योजनेविना
buldhana
मराठा आरक्षण: मोताळ्यातील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; दोघांना रुग्णालयात हलविले, आंदोलन चिघळले
msrtc step to make 577 st bus depot clean and beautiful
ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरूच

संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत कारखानदारांकडून कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्याने आज चक्काजाम आंदोलन हाती घेण्यात आले.  इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे, गुहागर विजापूर मार्गावरील पलूस येथे, पलूस मार्गावरील नांद्रे येथे कवठेमहांकाळ मार्गावरील शिरढोण येथे आणि बोरगाव फाटा, तुरची आदी ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक खंडित झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा; बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

गत हंगामात इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना चांगला पैसा मिळाला असल्याने यातील ४०० रुपये प्रतिटन देण्याची आमची मागणी असून, यंदा साखरेलाही बाजारात चांगला दर असल्याने यंदाच्या हंगामात पहिला हप्ता साडेतीन  हजार रुपये मिळावेत, या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन कोल्हापूर : स्वाभिमानीच्या या अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होतो. ऊस दरवाढीच्या मुद्यावरून गेल्या महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. मागणीला यश येत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज संघटनेकडून जिल्ह्यात १५ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नेते राजू शेट्टी हे हातकणंगले येथे आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  अंकली टोल नाक्यावर  आंदोलन केल्याने सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखून धरला गेल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sugarcane farmers sit on dharna on highways for additional amount of rs 400 per tonne zws

First published on: 20-11-2023 at 05:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×