मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाने मुंबईतील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच निमित्ताने शिंदे गट- उद्धव ठाकरे गट यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. हा मेळावा यशस्वी ठरावा यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यासंदर्भातच आज महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी ही बैठक आणि दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवसैनिक बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने जमणार आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच आमची भूमिका आहे, असे सुहास कांदे यांनी सांगितले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Video : “उलट-सुलट बोलाल तर याद राखा, तुमची शुगर..”, नारायण राणेंना शिवसेनेचा खोचक टोला!

दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून ३५० ते ४०० गाड्या जाणार आहेत. माझ्या मनमाड मतदारसंघातून आम्ही दोन रेल्वे आरक्षित केल्या आहेत. दोन रेल्वेंमधून शिवसैनिक मुंबईला मेळाव्यासाठी जाणार आहेत. याआधीही एकनाथ शिंदे यांनीच दसरा मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवाजी मैदानासाठी जी तयारी केली जात होती, अगदी तीच तयारी आता बीकेसी मैदानावर होत आहे. त्यामुळे आम्हाला हे काही नवे नाही, असे सुहास कांदे म्हणाले.

हेही वाचा >>> पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. या निकालाची छायांकित प्रत आम्हाला सोमवारी मिळणार आहे. त्यानंतर आम्ही ज्येष्ठ विधितज्ज्ञांशी चर्चा करू. सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, यावर एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या शिवसेनेची मानसिकता ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आहे, अशी माहिती सुहास कांदे यांनी दिली.

हेही वाचा >>> शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”

बीकेसीचं मैदान शिवाजी पार्कपेक्षा खूप मोठं आहे. आतापर्यंत आम्ही शिवसैनिक शिवतीर्थावर मोठ्या संख्येने जमा होत होतो. त्यामुळे बीकेसीचं मैदान भरवण्यासाठी आम्हाला काही मेहनत घ्यावी लागणार नाही. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे शिवसैनिक बीकेसी मैदानावर मोठ्या संख्येने जमतील, असा विश्वास सुहास कांदे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas kande and dussehra melava said will move to supreme court against high court decision prd
First published on: 24-09-2022 at 12:40 IST