scorecardresearch

“वंचितचा इंडिया आघाडीत समावेश झाला नाही तर…”, सुजात आंबेडकरांचा इशारा

“वंचितांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे का बंद आहेत?” असा सवालही सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला

sujat ambedkar
सुजात आंबेडकर इंडिया आघाडीवर बोलले आहेत. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. पण, ‘इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं ४८ जागांवर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते, सुजात आंबेडकर यांनीही काँग्रेससह इंडिया आघाडीला इशारा दिला आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “भाजपाचा पराभव करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीनं वंचितला निमंत्रण देऊन समाविष्ट करायला हवं. पहिल्या निवडणुकीत ४२ लाख मते घेणारी वंचित आघाडी नक्कीच इंडिया आघाडीची ताकद वाढवू शकते. महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएसचा पराभव करण्यासाठी निर्णयक ठरू शकतो.”

devendra fadnavis
VIDEO : “इंडिया आघाडी आपल्याशी लढा देऊ शकत नाही, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
akola Adv Prakash Ambedkar advice Uddhav Thackeray
“भाजपच शिवसेना ठाकरे गट चालवतो…”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ
prakash ambedkar
“शिवसेनेसोबत ‘बोलणी’ झाली, पण लग्नाची तारीख निघायची बाकी!” प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी भटजी, ते…”
prakash ambedkar on bjp and rss
“भाजपा-आरएसएसकडून मुस्लीम-दलितांचा नरसंहार घडवण्याचा कट”, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान

हेही वाचा : “…तर पळून जाऊन लग्न करा”, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

“पण, इंडिया आघाडी विचित्र का वागतेय? त्यांच्याकडून निर्णय येत नाही. वंचितांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे का बंद आहेत? हा प्रश्न आमच्या डोक्यात सुरू आहे,” असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राज्यात भाजपाच बॉस”, फडणवीसांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या…

“इंडिया आघाडीकडून निमंत्रण आलं नाही, तरी निवडणूक लढणार. भाजपाचा पराभव करण्यासाठी आघाडी व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इंडिया आघाडीनं निमंत्रण दिलं नाही, तर कार्यकर्त्यांची इच्छा रागात बदलेल. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो,” असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sujat ambedkar on india alliance and warning congress ssa

First published on: 03-10-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×