छत्रपती संभाजीनगर : एकनाथ – भानुदासाचा गजर करणाऱ्या लाखो भाविकांमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार सुजय विखे दाखल झाले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या साक्षीने फुगडी घातली. रावसाहेब दानवे हे नेहमी ग्रामीण भागाशी त्यांची असणारी नाळ कशी जोडली आहे, हे दाखवून देतात.

जनावरांचे वय किती हे ठरविण्याची कसोटी म्हणजे त्याचे दात बघणे, एकदा रावसाहेबांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना बैलाचे दात मोजले होते. ते गावातील चावडीवर कार्यकर्त्यांबरोबर डब्बा पार्टी करतात. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची मतदारसंघातील फुगडीचीही आता राजकीय अंगाने चर्चा होऊ लागली आहे.

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

आपल्या भाषणांतील मनोरंजक राजकीय किस्से ऐकवत रावसाहेब दानवे मोठय़ा सभा गाजवतात.   ते अनेकदा गावागावात चावडीवर जाऊन बसतात. लोकांशी गप्पा मारतात. कोणत्या गावात किती मतदान मिळाले होते.

गेल्या वेळी कोणत्या कार्यकर्त्यांनी मते मिळविण्यासाठी काम केले होते, त्याची इत्थंभूत माहिती त्यांचेकडे असते. आज रावसाहेबांनी नाथषष्ठीनिमित्त घातलेली फुगडी मात्र वारकऱ्यांमध्ये सोमवारी चर्चेचा विषय ठरली. सोमवारी पाच लाख भाविकांनी पैठण येथे हजेरी लावली.