गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विमानतळावर विमान अपघातात अकाली निधन झालं आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चेतला विषय ठरला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं आता काय होणार? मूळ पक्षात विलीनीकरण की स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार? एकीकडे ही चर्चा चालू असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra Political News Updates, 30 Jan 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात आज काय महत्त्वाचं घडलं? जाणून घ्या Top 5 राजकीय घडामोडी!

18:36 (IST) 30 Jan 2026

'शो मस्ट गो ऑन', सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलत असताना छगन भुजबळ यांचे सुचक विधान

Chhagan Bhujbal on Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना उद्या बैठकीसाठी मुंबईत बोलाविण्यात आले आहे. बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता छगन भुजबळ यांनी वर्तवली. ...वाचा सविस्तर
18:00 (IST) 30 Jan 2026

महाराष्ट्राला मिळणार पहिलीच महिला उपमुख्यमंत्री? जाणून घ्या सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल

Who is Sunetra Ajit Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार असून त्या उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे, हे जाणून घेऊ. ...सविस्तर वाचा
16:41 (IST) 30 Jan 2026

सूनेत्रा पवार यांची उद्या उपमुख्यमंत्रीपदी निवड होणार, लगेचच शपथविधी

शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. त्यात सूनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाईल. राष्ट्रवादीच्या वतीने लगेचच मुख्यमंत्र्यांकडे निवडीचे पत्र दिले जाणार आहे. ...वाचा सविस्तर
16:40 (IST) 30 Jan 2026

"… तर 'हे' घडलंच नसतं", आदल्या रात्री रस्त्याने जायचे टाळून फ्लाईट का घेतली? अजित पवारांच्या चालकानं सांगितलं…

Ajit Pawar Driver Shyamrao Manve Reaction: दिवंगत अजित पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून सारथ्य करणारे शामराव मनवे यांनी २८ जानेवारी रोजी सकाळी काय घडले? याची माहिती दिली आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 30 Jan 2026

Ajit Pawar : अजित 'दादांची' शेवटची इच्छा काय होती? कोणती कागदपत्रे मागवली होती? त्यांच्या जवळच्या मित्राने केला खुलासा

अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत काही नेत्यांनी वक्तव्य केल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. ...सविस्तर वाचा

Ajit Pawar NCP Merger

अजित 'दादांची' शेवटची इच्छा काय होती? कोणती कागदपत्रे मागवली होती? त्यांच्या जवळच्या मित्राने केला खुलासा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Maharashtra Political News Updates, 30 Jan 2026: महाराष्ट्राच्या Top 5 घडामोडी!