Sunetra Pawar Oath Taking Ceremony Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra First Female Deputy CM Swearing-n Ceremony Updates : राजकीय घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

21:13 (IST) 31 Jan 2026

“अजितदादांची उणीव भरून निघणार नाहीच; पण…” सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना अजितदादांची उणीव कधीच भरून निघणार नसल्याचे सांगितले. मात्र पक्ष आणि कार्यकर्ते सावरणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
21:13 (IST) 31 Jan 2026

“अजितदादांची उणीव भरून निघणार नाहीच; पण…” सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना अजितदादांची उणीव कधीच भरून निघणार नसल्याचे सांगितले. मात्र पक्ष आणि कार्यकर्ते सावरणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
21:08 (IST) 31 Jan 2026

मुंबईतील या प्रभागात मताधिक्य किती कोणालाच माहीत नाही; भाजपच्या पराभूत उमेदवाराचा आक्षेप

मुंबईतील मालाड प्रभाग क्रमांक ४३ मध्ये मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे मताधिक्याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. तरीही निकाल जाहीर झाल्याने भाजपच्या पराभूत उमेदवाराने आक्षेप घेत उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. ...सविस्तर वाचा
20:32 (IST) 31 Jan 2026

भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाची सोमवारी होणार गटनोंदणी; पालिका मुख्यालयातून शक्तीप्रदर्शन करीत एकत्र निघणार

मुंबई महापालिकेत महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे) सोमवारी संयुक्त गटनोंदणी करणार आहेत. पालिका मुख्यालयातून शक्तीप्रदर्शन करत नगरसेवक कोकण भवनकडे जाणार असून महायुतीची रणनीती स्पष्ट होणार आहे. ...अधिक वाचा
19:43 (IST) 31 Jan 2026

भाजपच्या सत्तेला मुस्लीम नगरसेवकांचे बळ; तीन कोटी दिल्याचा विरोधकांचा गंभीर आरोप

अकोला महापालिकेत मुस्लीम नगरसेवकांच्या मतांच्या बळावर भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बहुमतासाठी प्रत्येकी तीन कोटी रुपये व भाजी बाजारात दुकाने देण्याचे आमिष दाखविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
18:56 (IST) 31 Jan 2026

Sunetra Pawar: नियतीचा अजब खेळ: धाराशिवच्या लेकीवर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी

धाराशिवमध्ये जन्मलेल्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवनमध्ये शिकलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ...अधिक वाचा
18:46 (IST) 31 Jan 2026

Sunetra Pawar Portfolios: उपमुख्यमंत्रीपद मिळालं पण अजित पवारांचं अर्थ खातं नाहीच, सुनेत्रा पवार यांना मिळाली 'ही' तीन खाती

Sunetra Pawar Portfolios: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे अर्थ, नियोजन अशी महत्त्वाची खाती होती, ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळावीत, अशी अपेक्षा पक्षाला होती. मात्र सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुर्तास तरी अर्थ खाते देण्यात आलेले नाही.

सविस्तर वाचा

18:45 (IST) 31 Jan 2026

व्हिडिओ : भाजपमध्ये राहून पक्ष उमेदवाराविरोधात काम कोणाचे? - आमदार रणधीर सावरकर म्हणतात, ‘देवेंद्रजींनंतर मीच करेक्ट कार्यक्रम…’

अकोला महापालिका निवडणुकीनंतर भाजपमध्ये राहून पक्ष उमेदवाराविरोधात काम करणाऱ्यांना आमदार रणधीर सावरकर यांनी इशारा दिला असून योग्य वेळी कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ...सविस्तर वाचा
18:42 (IST) 31 Jan 2026

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची जबाबदारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर लगेचच सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली. क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/2017584471491678607

18:27 (IST) 31 Jan 2026

“त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात…”, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच रोहित पवारांची पोस्ट

Rohit Pawar on Sunetra Pawar: अजित पवारांचे निधन झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. पक्षाच्या मागणीनंतर सुनेत्रा पवार यांना या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन गटातील विलीनीकरणाच्या चर्चेमुळे हा निर्णय आणखी कसोटीचा ठरला. शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि उर्वरित पवार कुटुंबाला या निर्णयाबाबत विश्वासात घेतले नसल्याचा मुद्दाही समोर आला. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातून कुणीही शपथविधीला उपस्थित राहिले नाही. मात्र आता शपथविधीनंतर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट टाकून आपल्या काकींना शुभेच्छा दिल्या आहेत.

सविस्तर वाचा

18:04 (IST) 31 Jan 2026

सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची लोकभवनात घेतली शपथ

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या होत्या. आज सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

17:51 (IST) 31 Jan 2026

"शुभेच्छा तरी कशा द्याव्यात...", सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर रोहित पवारांची पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.यानंतर आमदार रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले की, "राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2017571950705709179

17:42 (IST) 31 Jan 2026

अमरावती जिल्ह्यात ‘उमेद’ची भरारी -तब्बल १.८७ लाख महिला ‘लखपती दीदी’!

अमरावती जिल्ह्यात उमेद अभियानाअंतर्गत लखपती दीदी योजनेने मोठी झेप घेतली असून आतापर्यंत १.८७ लाख महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. बचत गट व कर्जपुरवठ्यामुळे महिलांचा व्यवसाय वाढत आहे. ...अधिक वाचा
17:13 (IST) 31 Jan 2026
"मी सुनेत्रा अजित पवार…”, महाराष्ट्राला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Sunetra Pawar takes oath as first woman deputy cm of maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याबरोबरच सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.

वाचा सविस्तर

https://twitter.com/ANI/status/2017563449325457856

17:07 (IST) 31 Jan 2026

देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी ; मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांच्या कार्यपद्धतीला उजाळा

देशातील पहिल्या वकील प्रशिक्षण व संशोधन अकादमीचे पनवेलच्या तळोजा येथे उद्घाटन झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अजित पवारांच्या शिस्तबद्ध, दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीला उजाळा दिला. ...वाचा सविस्तर
17:06 (IST) 31 Jan 2026
सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची लोकभवनात घेतली शपथ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या होत्या. आज सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

https://www.youtube.com/live/YAHN1io7y0Y?si=nIujH9IFN7R1m6pN

16:17 (IST) 31 Jan 2026

VIDEO : १७ जानेवारीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेमकं काय सांगितलं?

अजित पवार यांच्या अपघातात निधन झाल्यामुळे चर्चा आता थांबल्या आहेत, असं शरद पवारांनी सांगितले. ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 31 Jan 2026
सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, गटनेता निवडीचे पत्र फडणवीसांकडे सादर

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर करण्यात आलं आहे.

https://twitter.com/ANI/status/2017544742423388367

15:57 (IST) 31 Jan 2026

सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारी

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. आता थोड्याच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारी सुरू करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/2017540983899230442

15:17 (IST) 31 Jan 2026

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
14:33 (IST) 31 Jan 2026
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदी निवड

अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/2017523645225341374

https://twitter.com/ANI/status/2017535363582140587

13:42 (IST) 31 Jan 2026

Anil Patil : सुनेत्रा पवारांचा एवढ्या घाईने शपथविधी का? अनिल पाटील यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "ही काळाची गरज…"

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची एवढी घाई का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. ...सविस्तर वाचा
13:17 (IST) 31 Jan 2026

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या बैठकीतील व्हायरल व्हिडीओवर सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत अजित पवार यांच्या उपस्थित एक बैठक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, यावर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आज व्हायरल असलेल्या व्हिडीओमध्ये जी बैठक दाखविण्यात आली. ती बारामतीमधील कृषी प्रदर्शनापूर्वी झालेली बैठक होती. त्यावेळी खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज संस्थांच्या बाबतीत त्या बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले होते", असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

13:04 (IST) 31 Jan 2026

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाची निवड कधी? सुनील तटकरेंची मोठी माहिती, म्हणाले, 'आता २ वाजता...'

अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. याबाबत बोलताना सुनील तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आताच एक आमची बैठक पार पडली. आता २ वाजता विधीमंडळ राष्ट्रवादी पक्षाची बैठक होईल. जेनतेच्या भावना लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे", असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

12:33 (IST) 31 Jan 2026

मुंबईत घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार थोड्याच वेळात खासदारकीचा राजीनामा देणार

अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी सुनेत्रा पवार थोड्याच वेळात खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा होते? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

12:29 (IST) 31 Jan 2026

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात भाजपकडून खोडा?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शरद पवार यांचा निर्णय अंतिम राहील, ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा निर्णय प्रक्रियेत वरचष्मा राहील. हे अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांबरोबरच भाजपच्या दृष्टीनेही अडचणीचे ठरणार आहे. ...सविस्तर बातमी
11:36 (IST) 31 Jan 2026

शरद पवारांच्या निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग, पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, काय चर्चा होणार?

अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा होते? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

11:31 (IST) 31 Jan 2026

Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोण-कोण जाणार? शरद पवार म्हणाले, "मला…"

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज सायंकाळी त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...सविस्तर बातमी
10:54 (IST) 31 Jan 2026

शरद पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह नेत्यांची बैठक सुरू, राजकीय घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. तर दुसरीकडे बारामतीत शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह आदी नेत्यांची बैठक सुरू आहे.

10:43 (IST) 31 Jan 2026

Sunetra Pawar: राजकारणात रस नाही सांगणाऱ्या सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदार असल्या तरी सामाजिक कामाचा शुभारंभ त्यांनी सासरी कोटेवाडीतून केला. या आहेत त्यांच्या बाबतच्या खास बाबी. ...सविस्तर वाचा

Sharad Pawar On Sunetra Pawar Deputy CM

राष्ट्रवादीची सूत्रे भाजपच्या हाती; सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याची खेळी; शरद पवारांना दूर ठेवण्याचे प्रयत्न, (फोटो-संग्रहित छायाचित्र)