Sunil Tatkare On AAIB Report : अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या विमान अपघाताला आता एक महिना होऊन गेला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विमान अपघाताबाबतचा एएआयबीचा २२ पानांचा प्राथमिक चौकशी अहवालही समोर आला. त्यामध्ये एएआयबीने विविध निष्कर्ष मांडले आहेत.
एएआयबीने जारी केलेल्या प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता (Visual Flight Rules), नियमांचं उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही, अशा विविध गोष्टींवर बोट अहवालात बोट ठेवलं आहे. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले होते.
त्यानंतर आता एएआयबीच्या प्राथमिक चौकशी अहवालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत एएआयबीने जारी केलेल्या प्राथमिक अहवालात त्रुटी असून त्या अहवालातून कुणाचंही समाधान नाही’, असं सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत मी एवढं म्हटलं आहे की एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर आमचं कोणाचंही समाधान नाही. त्या प्राथमिक अहवालात त्रुटी आहेत. या अपघाताबाबत ज्या-ज्या काही शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यासहित या घटनेचा तपास परिपूर्ण पद्धतीने व्हावा आणि लवकरात लवकर तो तपास राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर यावा. ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व सदस्याची भूमिका आहे”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
एएआयबीने प्राथमिक अहवालात काय म्हटलं?
-पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नानंतर गो अराऊंड.
-पहिल्या लँडिंगचा प्रयत्न धावपट्टी ११ वर
-दृश्यमानता कमी असताना लँडिंगचा प्रयत्न.
-विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला ५० मीटरवर कोसळलं.
-अपघाताच्या काही क्षण आधी कॉकपिटमधून “Ohh Shit” आवाज.
-अपघातावेळी विमान आधी झाडांवर कोसळलं नंतर जमिनीवर.
-अपघातानंतर विमानाला आग लागली.
प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2026
या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने… pic.twitter.com/wBqnip7tjA
एएआयबीने कोणत्या गोष्टींवर बोट ठेवलं?
-दुष्यमानता VFR मर्यादेपेक्षा कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न.
-एअरफिल्ड सुविधांचे अपुरे मानक.
-बारामतीत अधिकृत किंवा स्वतंत्र MET सुविधा नाही.
-हवामान आणि मूलभूत नेव्हिगेशन सहाय्यांमध्ये कमतरता.
-तसेच CVR/FDR च्या सविस्तर विश्लेषणानंतर अपघाताचं कारण समोर येईल.
