scorecardresearch

SC Hearing over Thackeray vs Shinde Faction: राज्याचा सत्तासंघर्ष एक महिना लांबणीवर, पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास मंगळवारी झालेल्या सुनावणीत नकार दिला आहे.

SC Hearing over Thackeray vs Shinde Faction: राज्याचा सत्तासंघर्ष एक महिना लांबणीवर, पुढील सुनावणी थेट १ नोव्हेंबरला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर आता राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सुटण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

Thackeray vs Shinde: सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हा खूप मोठा…”

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? हा वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळातील बहुमत शिंदे गटाच्या बाजूला असल्यामुळे खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह इतर मुद्द्यांवर १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

“हा शिवसेनेला धक्का का मानावा? निवडणूक आयोग..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका!

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. “केंद्रीय निवडणूक आयोग मेरिटप्रमाणे निर्णय घेईल. लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. निवडणूक आयोगासमोर जो काही निर्णय होईल तो नियम, निकष आणि मेरिट या सर्वाचा विचार करुनच होईल”, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेला धक्का नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या