Supriya Sule On Ajit Pawar : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले. यानंतर नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ईव्हीएमच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न विचारणात आला होता.

अजित पवारांबद्दल काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामतीच्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी जे कोणी निवडून आले आहे, ज्यांना कुठेले पद मिळाले आहे त्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यावेळी ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला वाटतं लोकांमध्ये ईव्हीएमबाबत खूप चर्चा सुरू आहे, त्याबद्दल खूप चिंता आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर लोक ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करत असतील, तर मला वाटते की आपण मतपत्रिकांकडे वळलो तर ते चांगले होईल.”

अखिलेश यादव यांच्याशी करणार चर्चा

दरम्यान आज अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत भाष्य केले होते. याबाबतही सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “मी याची पक्की माहिती घेईन. कारण आम्ही अखिलेश यादव यांच्यासोबत दिल्लीत जवळून काम करत आहोत. त्यांनी महाराष्ट्रात काय भूमिका घेतली हे मला माहीत नाही, पण मी अखिलेश यादव यांच्याशी या विषयावर नक्की बोलेन.”

हे ही वाचा : विरोधी पक्षांच्या आमदारांनी जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार? भुजबळ म्हणाले…

इंडिया आघाडीचे नेतृत्त्व

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच, इंडिया आघाडीचे नेतृत्त्व करण्याबाबत भाष्य केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, “ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग आहेत. लोकशाहीत, विरोधी पक्षाची मोठी भूमिका आणि जबाबदारी असते, त्यामुळे त्यांना आणखी काही जबाबदारी घ्यायची असेल, तर आम्हाला खूप आनंद होईल.”

हे ही वाचा : भगवे-गुलाबी फेटे ते संस्कृतमध्ये शपथ, जाणून आमदारांच्या शपथविधीची वैशिष्ट्ये

राष्ट्रवादीला (शरद पवार) सर्वात कमी जागा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीने धुव्वा उडवला आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला (शरद पवार) सर्वात कमी १० जागा जिंकता आल्या. यामध्ये शिवसेनेने (उद्धव ठाकरे) २० आणि काँग्रेसने १६ जागांवर विजय मिळवला.

Story img Loader