राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपमुख्यमंत्री ‌अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “राष्ट्रवादी जीवलग” या उपक्रमाची घोषणा केली आहे. करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टद्वारे दिला जाणार आहे.

“करोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेल्या राज्यातील बालकांचे भविष्य‌ अंधकारमय होते‌ की काय, अशी भीती‌ होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली आहे. त्याचबरोबर या मुलांना आपल्या जवळचे व्यक्तीचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी‌ काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी‌ जीवलग उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ४५० ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ या मुलांचे पालक बनणार आहेत.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

कोविड अनाथांशी आपुलकीचं नातं!, ”राष्ट्रवादी जीवलग” देणार मायेचे आश्वासक छत्र!! राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा अभिनव संकल्प!!! अशा मथाळ्या खाली पत्रक काढण्यात आलं आहे. या पत्रकावर खासदार सुप्रिया सुळे व विश्वस्त हेमंत टकले यांची स्वाक्षरी आहे.

यामध्ये म्हटलं आहे की, ”चिमुकल्या जिवांचं आभाळगत मायेचं छत्र करोनाने हिरावून घेतलं. या लहानग्यांसोबत कायमस्वरूपी आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुढाकार घेतलाय. त्यांना हक्काचे दादा-ताई, भाऊ-आक्का, काका-काकू, मामा-मामी, आत्ये-तात्या बनण्यासाठी आणि त्यांचा विश्वासाचा माणूस म्हणून आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे युवक, युवती, विद्यार्थी यांतून निवडलेले जीवलग कार्यकर्ते पुढे येत आहेत. ते या मुलांच्या आयुष्यातील सच्चे भागीदार होतील. त्यांचे मित्र, सहाय्यक, मार्गदर्शकही होतील.”

”चाकोरी पलीकडे जाऊन या मुलांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे हे जीवलग आपुलकीने प्रयत्न करतील. त्यांना कोमजू न देता, त्यांनी आयुष्य पुन्हा स्वच्छंदी पाखराप्रमाणे जगावं यासाठी समरसून प्रयत्न करतील. ही मुलं अनाथपण विसरून या जीवलगांकडे हक्कानं व्यक्त होतील. हट्ट धरतील, रडतील, खेळतील. या मुलांच्या सातत्याने भेटी होतील. त्यातूनच आधाराचा आश्वासक हात घट्ट होत जाईल. त्यांच्या अडणींच्या काळात, सुख दुःखात हक्काचं मायेचं छत्र राष्ट्रवादीचे जीवलग बहाल करतील. चला, तर मग या लहानग्यांना आधार देऊया…, त्यांच्याशी आपुलकीचं नातं निर्माण करूया…”