राज्याच्या राजकारणामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेला एक दावा खोडून काढलाय. राज ठाकरेंनी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना करताना एकाच्या घरावर छापेमारी होते आणि दुसऱ्याचा नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर टीका केली होती. याच टीकेला आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय.

नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज काय म्हणालेले?
राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका ठाण्यात १२ एप्रिल रोजी मनसेनं आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये केली होती. अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही. आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोलाही राज यांनी भाषणामध्ये लगावला होता. 

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
याच आरोपावरुन सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांच्या घरावर छापा पडल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं. “मला कुणाची चूक नाही काढायची. माझा तो स्वभाव नाही. पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

तुलनेचा प्रश्नच येत नाही…
तसेच राज ठाकरेंचा थेट उल्लेख टाळत सुप्रिया यांनी, “त्यामुळे कदाचित लोकांना चुकीची माहिती दिली असेल. माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत कधीच रेड झालेली नाही. (टीकेचा) बेसच चुकीचा असल्याने तुलनेचा प्रश्न येतच नाही,” असंही सांगितलं.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

नवऱ्याला नोटीस आल्याची दिली माहिती…
पुढे बोलताना सुप्रिया यांनी, “मी बऱ्यापैकी बोलते भाषणांमध्ये त्यांच्याविरोधात पण मला अजून तरी ईडीची नोटीस आली नाही. माझ्या नवऱ्याला आयकर विभागाकडून टॅक्सची नोटीस आलीय. तीन भाषणं विरोधात केल्यानंतर त्यादिवशी तिसरं भाषण तेव्हा संध्याकाळ चार वाजता आयटीची नोटीस आली,” असंही हसत हसत सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule answers question on raj thackeray saying raid happened at ajit pawar home not on sharad pawars daughters home scsg
First published on: 21-04-2022 at 11:37 IST