Premium

“माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

“सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

prafull patel supriya sule
प्रफुल्ल पटेलांवर सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे. त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही. पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं.”

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंनी आमच्या सरकारला ‘सळो की पळो’ केलं नाहीतर…”, भाजपा खासदाराचा टोला

“दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठं नुकसान हा अदृश्य हात करीत आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजपानं महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule attacks prafull patel over ncp party in nagpur ssa

First published on: 02-10-2023 at 10:20 IST
Next Story
Maharashtra News: “संजय राऊत लिहिताना चिलीम आणि बोलताना…”, आशिष शेलारांची टीका