Supriya Sule : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्रासाठी ही घटना अत्यंत अनपेक्षित होती. पवार कुटुंबावर आणि महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी याबाबत अजितदादांनी कुठलीही कल्पना दिली नव्हती असं म्हटलं आहे. दुसरीकडे अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी विलिनीकरण होणार होतं असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बुधवारी विलीनीकरणाबाबत विचारणा केली असता रामकृष्ण हरी म्हणत त्यांनी हात जोडले. मात्र आज त्यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

रोहित पवारांना सरकारने सुरक्षा दिली पाहिजे-सुप्रिया सुळे

अजित पवारांसाठी ज्याप्रमाणे रोहित पवार लढत आहेत. ते अनेक मुद्दे आणि भावना मांडत आहेत. मुलांमध्ये अस्वस्थता आहे. रोहितमध्ये अस्वस्थता आहे धावपळ करून अनेक मुद्दे समोर आणले. समस्त पवार कुटुंब आणि लाखो लोकांना मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणारे आहेत. पार्थ आणि जय यांना मोठा धक्का आहे. यातून जय यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित अनेक मुद्दे मांडत आहे अनेकांना त्याची काळजी वाटत आहे. त्यामुळे सरकारने रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जयने जे स्टेटस ठेवलं त्याच्या मनात अस्वस्थता आहे. जय, पार्थ, वहिनी आणि लाखो लोक ज्यांच्या मनात अस्वस्थ प्रश्न आहेत. पार्थ आणि जयसाठी अजितदादांचा अपघात हा मोठा धक्का आहेच. आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे असंच नाही आमच्यावर प्रेम करणारे सगळेच या दुःखात एकत्र आहेत. दादाची स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

विलिनीकरणाबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले. तसेच महानगरपालिकेसह, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार होते. अमोल कोल्हे यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार होते. तटकरे आणि पटेलांमुळे हे सर्व रखडतंय का याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सुळे यांनी रामकृष्ण हरी असे उत्तर दिले. तर अमोल दादा यावर सविस्तर बोलले आहेत. पक्षाचं वास्तव अमोल दादा यांनी मांडले आहे. वेगळं मला बोलावासं वाटत नाही, असे सुळे म्हणाल्या. माझा भाऊ गेला आहे. त्याचं दु:ख आयुष्यभर भरून निघणार नाही. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, हे दुःख कधीच भरुन निघणार नाही. आता दादा राहिले नाहीत, काय फरक पडतो आता काय खोटं काय खरं कशाला करत बसायचं? सीसीटीव्ही कशाला हवा. माणसं आहेत ना बोलायला. खरं, आता सगळ्यांना माहिती आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी काही खरं खोटं करत बसणार नाही. आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल.त्याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतंच. कार्यकर्त्यांनाही हेच वाटत होतं. मला वाटतं आता या सगळ्याला पूर्णविराम देऊ. आम्हालाही अस्वस्थ वाटतं. माझ्यापेक्षा वयाने जे लोक मोठे आहेत त्यांच्या विरोधात बोलणं माझ्या संस्कारांत बसत नाही. माझा भाऊ तर गेला, आता कुठे खरं खोटं करायचं? वास्तव माझ्या भावाला माहीत होतं आणि मला माहीत आहे. प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे.