आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा ‘भाऊबीज’ सण साजरा केला जात आहे. विविध राजकीय नेत्यांनी आपल्या बहिणीबरोबर हा सण साजरा करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपला भाऊ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर भाऊबीज साजरा केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित व्हिडीओत सुप्रिया सुळे आपल्या इतर बहिणींसमवेत अजित पवारांना एकत्रित ओवाळताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना ओवाळल्यानंतर त्यांच्या पायाही पडल्या आहेत. बहिण-भावाच्या या अनोख्या नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar Statement about Sharad Pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”

विशेष म्हणजे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. जवळपास ४० आमदारांसह अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाचं? यावरूनही वाद सुरू आहे. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना अजित पवार दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण काल रात्री उशिरा अजित पवारांनी गोविंद बागेत जाऊन कुटुंबाची भेट घेतली.

यानंतर आज भाऊबीज सणानिमित्त सुप्रिया सुळे स्वत: अजित पवारांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी अजित पवारांना ओवाळलं आणि चरणस्पर्श केले. याबाबतचा एक व्हिडीओ खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. “भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज… या सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असं कॅप्शनही सुप्रिया सुळे यांनी लिहिलं.

Story img Loader