मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डीला गेले असताना अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याचं म्हटलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धेवर आमचा सर्वांचा विश्वास आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. त्यांनी अंधश्रद्धेविरोधात खूप मोठं काम या राज्यात आणि देशात उभं केलं.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
eknath shinde raj thackeray (2)
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

“अंधश्रद्धा निर्मुलनासाठी डॉ. दाभोलकरांनी आयुष्य पणाला लावलं”

“अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं. त्यामुळे महत्त्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, मात्र, अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात एक वेगळं मत आहे,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : कर्नाटक सरकारच्या दडपशाहीसमोर महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का? मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, “आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतो मला समजत नाही. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, विश्वास असतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही. त्यामुळे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केली पाहिजे.”

“शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही…”

“एक गोष्ट खरी आहे की, आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होतं तेव्हा आम्ही सकाळी सकाळी लवकर जाऊन शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. पंढरपूर परिसरात जातो तेव्हा आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतो. जेजुरी परिसरात जातो तेव्हा खंडेरायाचं दर्शन घेतो. तुळजापूर परिसरात तुळजाभवानीचं दर्शन घेतो. कोल्हापुरात गेल्यावर अंबाबाईचं दर्शन घेतो,” असं अजित पवारांनी नमूद केलं.

“ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे…”

अजित पवार पुढे म्हणाले, “ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे.”

हेही वाचा : “संजय राऊत बोकडाची औलाद”, आमदार संजय गायकवाडांच्या टीकेला राऊतांचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले…

“आमच्यासारखे तर हतबलच झालेत”

“तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतंय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावं, आमच्यासारखे तर हतबलच झालेत,” असं म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले.